निंबळक येथे ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत खरीप पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने ‘खेत बचओ अभियान’ अंतर्गत निंबळक येथे खरीप हंगामातील पिकांच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठदाता.विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांचे मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ज्वारी सुधार प्रकल्पाचे प्रमुख व सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिके—बाजरी, मुग, उडीद व तूर—यांच्या सुधारित वाणांची माहिती देत बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम स्पष्ट केला.यावेळी कार्यक्रमात ‘धनशक्ती’ या बाजरी वाणाचे प्रात्यक्षिकासाठी बियाणे तसेच जैविक खते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. विद्यापीठ निर्मित जैविक खते, कीडनाशके व फुले ग्रेड-२ चा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले. अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र हिले यांनी शेतीतील खर्च व्यवस्थापन व यांत्रिकीकरणाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. विवेक शिंदे यांनी मका लागवड तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान केले. डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी संतुलित खत व्यवस्थापन, लागवड तंत्रज्ञान तसेच “फुले कृषी तंत्रज्ञान घरोघरी, समृद्धी येईल गावोगावी”या उपक्रमांची माहिती देत शेतकऱ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमाचे नियोजन साईबाबा कृषी गट, निंबळक व ज्वारी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून करण्यात आले. याप्रसंगी श्री. भाऊराव गायकवाड, बाबासाहेब कोतकर, अजय लामखडे, घनश्याम म्हस्के तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. उदय दळवी, डॉ. विजय शिंदे, बाळासाहेब चौधरी, दीपक चव्हाण व रावजी पठारे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कृषी सहाय्यक श्री. सुनील कोकरे यांनी केले.
दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार







