Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे 

मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी कलाकार एकत्र येत जिल्हाधिकायांना निवेदन दिले आहेत. ‘मराठी चित्रपटसृष्टी बचाव आंदोलना’चे अध्यक्ष सी. ए. प्रसाद दत्तात्रय इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने जाहीर केलेल्या सांस्कृतिक धोरण २०२४ ची अद्याप प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी एकत्र येत शासनासमोर १६ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांमध्ये सांस्कृतिक धोरण २०२४ ची अंमलबजावणी व आवश्यक GR, मराठी चित्रपटांना थिएटर व प्राइम टाइमची हमी, थिएटर रेंटिंग बंद करून Revenue Sharing Model, Box Office Collection मध्ये पारदर्शकता, स्वतंत्र

डिजिटल वितरण व्यवस्था आणि चित्रपट प्रमोशनसाठी शासकीय माध्यमे सवलतीत उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. तसेच VPF Charges रद्द करणे, प्रत्येक तालुक्यात आधुनिक थिएटर, बंद थिएटर व मिनी थिएटर सुरू करण्यासाठी अनुदान, Mobile Cinema ची सुविधा, प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक पोलीस सेल, कलाकारांच्या मानधनांचे थेट बँक पेमेंट, नवोदित कलाकार व तंत्रज्ञांसाठी Talent Opportunity योजना आणि नवीन लेखकांसाठी कथा-पटकथा शोध अभियान व डिजिटल डेटाबेस तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय दर तीन महिन्यांनी Short Film स्पर्धा, नाटक-एकांकिका – डान्स क्षेत्रासाठी Talent Hunt, प्रत्येक तालुक्यात नाटयगृह व प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक केंद्र,

तसेच कलाकार व तंत्रज्ञांसाठी किमान मानधन, लेखी करार, बेळेत पेमेंट आणि सामाजिक सुरक्षा लागू करण्याची मागणी आहे.चित्रपटगृहांमधील ब्लॅक तिकीट विक्रीला आळा घालणे, निर्मात्यांना दररोजचे कलेक्शन रिपोर्ट व CCTV फुटेज उपलब्ध करून देणे आणि मराठी चित्रपटांचे बोर्डिंग लावणे, यांसारख्या पारदर्शक उपाययोजनांचीही मागणी करण्यात आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी शासनाने केवळ आश्वासने न देता ठोस निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी भूमिका ‘मराठी चित्रपटसृष्टी बचाव आंदोलना’च्या माध्यमातून कलाकारांनी घेतली आहे.यावेळी जिल्हा अधिकारी यांना निवेदंन देताना नगर जिल्हा कलाकार ग्रुप चे समन्वक बाळासाहेब वराळे पुष्पा परते यांच्यासह इतर कलाकार राजेश मंचरे अनिस मोहम्मद. संजय गायकवाड अयुब आतार गोरख पांढरे सुनिता सोनवणे बाळासाहेब बनसोडे अनिल सकट शंकर डुकरे ताराचंद विटनोर भारत थोरात व इतर कलावंत उपस्थित होते.

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

0
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप राहुरी विद्यापीठ, दि. 19 ऑगस्ट, 2026 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन...

महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न कुलगुरू डॉ. विलास...

0
महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न कुलगुरू डॉ. विलास खर्चे राहुरी विद्यापीठ, दि. 15 ऑगस्ट, 2026 कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन,...

error: Content is protected !!