Homeताज्या बातम्यानंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

राहुरी विद्यापीठ, दि. 19 ऑगस्ट, 2026 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्प आणि डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उपयोजनेअंतर्गत निविष्ठा वाटप कार्यक्रम व शेतकरी मेळावा मौजे श्रावणी, ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे उत्साहात पार पडला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली तसेच संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार श्री. एस. वाय. पुरी, प्रकल्प संचालक, आत्मा, नंदुरबार श्री. दीपक पटेल, सहाय्यक निबंधक, नवापूर श्री. सागर गवंड, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारचे प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोंडे, शास्त्रज्ञ सौ. आरती देशमुख, पीक विशेषज्ञ डॉ. व्ही. आर. गुरवे, श्रावणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. प्रभा भाईदास कोकणी तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री. संदीप ईश्वर कोकणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शास्त्रज्ञ व ग्रामस्थ उपस्थित होते.

 या उपक्रमांतर्गत श्रावणी गावातील 40 आदिवासी शेतकर्यांना प्रत्येकी 25 नग केशर आंब्याची रोपे वितरित करण्यात आली. त्यासोबत प्रत्येकी 2 लिटर फुले सुपर बायोमिक्स, 2 लिटर फुले सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-2, कृषिदर्शनी 1 नग व सायकल कोळपे 1 नग अशा विविध कृषि निविष्ठांचे वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनात विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आंबा लागवड, पीक व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, सेंद्रिय निविष्ठांचा प्रभावी वापर तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञान याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी आदिवासी शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन फळपिकांच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन उद्यानविद्यावेत्ता डॉ. सुभाष गायकवाड, रोग शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे आणि कीटक शास्त्रज्ञ डॉ. अजय हजारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि सहाय्यक श्री. दत्तात्रय गायकवाड आणि डाटा ऑपरेटर श्री. विलास खिलारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यापीठ. प्रतिनिधी. आर.आर.जाधव 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

0
महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंत्री मंगल प्रभात लोढा...

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात ३० ऑक्टोंबर ला शिर्डीत महामोर्चा

0
शिर्डी : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या संघटना व समाजबांधवांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी...

राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

0
राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी  राहुरी शहरातील बाजारपेठेत हातगाडीवर तसेच रस्त्यालगत छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरील अतिक्रमणाची कारवाई सणासुदीच्या काळात तात्पुरती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

error: Content is protected !!