महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ट्रायकोडर्मा निर्मिती कंटेनरला डिझाईनसंबंधीचे पेटंट प्राप्त
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि संशोधन केंद्र, कुंदेवाडी, ता. निफाड, जि. नाशिक येथील वनस्पती रोगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक (रोगशास्त्रज्ञ) डॉ. पोपट खंडागळे यांनी स्ट्रॉबेरीच्या प्लेटप्रमाणे जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा तयार करण्यासाठी रचना प्रारूप तयार केले आहे. त्यास भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यता दिली आहे. व्यापारी तत्त्वावर ट्रायकोडर्मा तयार करण्यासाठी काचेच्या बाटल्या प्रत्येक वेळेस निर्जंतुक कराव्या लागतात. परंतु या कंटेनरमध्ये त्याची गरज नाही. प्लेट फक्त बाह्य निर्जंतुकीकरणावर देखील बुरशीची योग्य वाढ होते. यासाठी वारंवार निर्जंतुकीकरणाची गरज नसल्याने वीज बिलाची तसेच मानवी श्रमाची बचत होते. हे कंटेनर स्वस्त, रिसायकलेबल, प्रदूषण विरहित व उपलब्ध सोपे आहे. हे कंटेनर तयार करण्यासाठी वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. टी. गायकवाड, गहू विशेषज्ञ डॉ. बी. एम. म्हस्के, डॉ. एस. बी. गावडे, डॉ. एन. एम. मगर, श्री. डी. बी. पाटील, डॉ. पी. बी. खैरे व डॉ. एच. आर. कुमावत यांचे सहकार्य लाभले.
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार







