राहुरी नगरपरिषद सेवा निवृत्त सफाई.कर्मचा-याच्या वारसांना न्याय मिळण्यासाठी राहुरी येथील रविंद्र भास्कर पलघडमल. सुगंध बबन ऊबाळे आणि आकाश अनिल गायकवाड हे १७ जुन पासून जिल्हाधिकारी अहिल्यानगर कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत
राहुरी नगरपरिषद सेवा निवृत्त सफाई कर्मचा-याच्या वारसांना न्याय मिळण्यासाठी दिनांक 08/03/2023 रोजी राहुरी नगरपरिषद राहुरी येथे नियुक्त अधिकारी मुख्याधिकारी यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय 24/02/2023 नुसार सेवा निवृत्त सफाई कर्मचा-यांच्या वारसांना लाडपागेच्या शिफारशीनुसार सेवेत सामावुन घेण्याकरीता अर्ज केला होता तरीही आजपर्यंत उपोषणकर्ते यांना नोकरीत सामावुन घेण्यासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नाही याबाबत त्यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, कक्ष अधिकारी नगरविकास विभाग मुंबई- उपसंचालक नगरपरिषद संचालनालय मुंबई-सह आयुक्त नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी साहेब आहिल्यानगर या सर्व प्रशासकिय अधिका-याने दिनांक 24/02/2023 च्या सुधारीत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले असतांना देखील नियुक्त अधिका-यांनी कोणतेही कार्यवाही केलेली नाही. तसेच सफाई कर्मचा-यांच्या वारसाबाबत मा. उच्च न्यायालय खंडपिठाच्या निर्णयानुसार अर्जदाराने अर्ज केल्यापासुन 6 आठवड्याच्या आत त्या संदर्भीय निर्णय देणे नियुक्त अधिकाऱ्याने निर्णय देणे बंधनकारक असतांना देखील या सर्व आदेशाची नियुक्ती अधिका-यांकडुन पायमल्ली/उल्लंघन केले जात आहे आम्हाला त्वरीत राहुरी नगरपरिषद, राहुरीच्या वर्ग 4 मध्ये सेवेत समावुन घेण्यात यावे. अशी मागणी या वेळी उपोषणाकर्त्यानी या वेळी केली आहे
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार







