Homeताज्या बातम्यास्वयंचलित यंत्रे व ए आय असिस्टेड यंत्रांमुळे श्रम कमी होऊन उत्पादन वाढेल...

स्वयंचलित यंत्रे व ए आय असिस्टेड यंत्रांमुळे श्रम कमी होऊन उत्पादन वाढेल कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे उदगार 

स्वयंचलित यंत्रे व ए आय असिस्टेड यंत्रांमुळे श्रम कमी होऊन उत्पादन वाढेल कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे उदगार 

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता स्वयंचलित व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रांची निर्मिती करणे गरजेचे आहे. कृषि विद्यापीठ व खाजगी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने काही यंत्रांमध्ये संयुक्तपणे संशोधन करून शेतकरीभिमुख स्वयंचलित व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रे हे शेतकर्यांसाठी श्रम कमी करणारे व शेतीचे उत्पादन वाढणारे असेल असे प्रतिपादन सामंजस्य कराराच्या वेळेस कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अ.शिं.कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाअंतर्गत भा.कृ.अ.प- अ.भा.स. कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प आणि मेसर्स साई सिद्धी एंटरप्रायझेस, एमआयडीसी,अहिल्यानगर व मेसर्स नियो फार्मटेक प्रा. लि., वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर यांच्यात ’ट्रॅक्टर-चलित मका काढणी यंत्र आणि सायलेज पॅकेजिंग’ आणि ’द्राक्षांच्या छाटणीनंतर प्रमुख रोगांचे निदान व व्यवस्थापन करण्यासाठी ए आय-असिस्टेड स्प्रेअरचे स्वयंचलीकरण’ या दोन यंत्राच्या सहयोगात्मक संशोधन आणि विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. प्रशांत बोडके, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे तर कंपनीच्या वतीने मेसर्स साई सिद्धी एंटरप्रायझेसच्या श्रीमती. छाया शिंगटे तर मेसर्स नियो फार्मटेकचे इंजि. योगेश गावंडे यांनी केल्या. कार्यक्रमास महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अ.भा.स कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड व या प्रकल्पाचे शास्त्रज्ञ प्रा. महेश पाचारणे, डॉ. संजय भांगरे, डॉ. रवीकिरण राठोड आणि एमआयडीसी अहिल्यानगरचे श्री. बाबासाहेब शिंदे व एमआयडीसी छत्रपती संभाजीनगरचे अभियंता योगेश गावंडे उपस्थित होते. या उपक्रमामुळे कृषि क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन शेतकर्यांना अधिक कार्यक्षम, वेळ वाचवणारी आणि उत्पादनवाढ साधणारी कृषि यंत्रे उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

विद्यापीठ प्रतिनिधी : आर.आर. जाधव 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

0
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप राहुरी विद्यापीठ, दि. 19 ऑगस्ट, 2026 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन...

error: Content is protected !!