Homeताज्या बातम्यामौजे बाभूळगाव येथे खेत बचाव अभियान संपन्न

मौजे बाभूळगाव येथे खेत बचाव अभियान संपन्न

मौजे बाभूळगाव येथे खेत बचाव अभियान संपन्न

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित चारापिके संशोधन प्रकल्पाच्या वतीने खेत बचाव अभियान आणि संतुलित खत वापर जागरूकता अभियानांतर्गत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी चारा पिकांचे तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम मौजे बाभूळगाव ता. राहुरी येथे संपन्न झाला. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांचे सूचनेनुसार व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय समन्वित चारापिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉ. कैलास भोईटे होते. याप्रसंगी बाबुळगावचे सरपंच श्री. गोरख गिऱ्हे,चारापिके संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. योगेश सैंदाणे, श्रीगणेश दूध डेअरीचे संचालक श्री. एकनाथ पाटोळे व वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. बी. जी. राठोड उपस्थित होते.  

 यावेळी डॉ. कैलास भोईटे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय, जैविक व हिरवळीच्या खतांचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीचा कर्ब वाढून जमीन सुपीक होईल. याप्रसंगी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये डॉ. योगेश सैंदाणे यांनी चारा पिकांमध्ये जैविक कीटकनाशकांचा कशाप्रकारे वापर करावा व त्यामुळे पशूंचे आरोग्य कसे अबाधित ठेवता येईल याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. बी. जी. राठोड यांनी मातीची सुपीकता वाढविण्यासाठी जमिनीत काय काय उपाययोजना कराव्यात व मातीचा नमुना कशा प्रकारे घ्यावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. योगेश सैंदाणे यांनी केले. यावेळी त्यांनी कृषी तंत्रज्ञान घरोघरी, समृद्धी येईल गावोगावी या संकल्पनेतून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी संतुलित खत वापर जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चारापिके संशोधन प्रकल्पातील श्री. सुहास भालेराव, श्री. संदीप ढगे, श्री. संजय पवार, श्री. समर्थ दुबळे व श्री. अक्षय पवार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी श्री. जालिंदर वाघमोडे, श्री. सुजित पाटोळे, श्री. अशोक पाटोळे, श्री. मच्छिंद्र वाघमोडे, श्री. अनिल थोरात तसेच बाभुळगाव, वरवंडी व खडकवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

0
महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंत्री मंगल प्रभात लोढा...

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात ३० ऑक्टोंबर ला शिर्डीत महामोर्चा

0
शिर्डी : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या संघटना व समाजबांधवांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी...

राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

0
राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी  राहुरी शहरातील बाजारपेठेत हातगाडीवर तसेच रस्त्यालगत छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरील अतिक्रमणाची कारवाई सणासुदीच्या काळात तात्पुरती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

error: Content is protected !!