Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षकांना डीवायएसपी पदावर पदोन्नती; राहुरीचे माजी पोलीस निरीक्षक अविनाश...

महाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षकांना डीवायएसपी पदावर पदोन्नती; राहुरीचे माजी पोलीस निरीक्षक अविनाश शंकर शिळीमकर.प्रमोद सदाशिव वाघ. धनंजय अनंत जाधव यांनाही बढती.

महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक दिवसांपासून रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून राज्यातील तब्बल २४७ पोलीस निरीक्षकांना पोलीस उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित केले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदलीचे आदेशही जाहीर करण्यात आले आहेत.यापदोन्नती यादीमध्ये राहुरी येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत राहिलेले अविनाश शिळीमकर.प्रमोद  वाघ. धनंजय जाधव.यांचा.देखील समावेश आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवाकाळाची दखल घेत त्यांना डीवायएसपी पदावर पदोन्नती देण्यात आली असून मुक्ताईनगर येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.प्रमोद वाघ यांनी राहुरीसह विविध ठिकाणी पोलीस दलात जबाबदारीची पदे सांभाळताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे उघडकीस आणणे तसेच जनसामान्यांशी सुसंवाद ठेवणे यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच राहुरी परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. वरिष्ठतेनुसार पदोन्नती मिळण्याची प्रतीक्षा अनेक अधिकारी करत होते. अखेर शासनाने मोठा निर्णय घेत २४७ अधिकाऱ्यांना एकाच वेळी पदोन्नती दिल्याने पोलीस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांवर आता उपविभागीय पातळीवरील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची जबाबदारी येणार आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या पदोन्नतींकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14 राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

0
महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंत्री मंगल प्रभात लोढा...

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात ३० ऑक्टोंबर ला शिर्डीत महामोर्चा

0
शिर्डी : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या संघटना व समाजबांधवांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी...

राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

0
राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी  राहुरी शहरातील बाजारपेठेत हातगाडीवर तसेच रस्त्यालगत छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरील अतिक्रमणाची कारवाई सणासुदीच्या काळात तात्पुरती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

error: Content is protected !!