महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हस्तांतरण सोहळ्याचे प्रक्षेपण
पश्चिम बंगाल येथील तारकेश्वर, हुगळी येथून देशातील नऊ कोटीं 44 लाख शेतकऱ्यांना 18,880 कोटी रुपयांचा पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेचा 23 वा हप्ता पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी वितरित केला. यानिमित्ताने PM-KISAN उत्सव दिवस साजरा करण्यात आला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचेे कुलगुरु डॉ. विलास खर्चे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण विद्यापीठात विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसाठी करण्यात आले. याप्रसंगी आंतरविद्याशाखा जल व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार पाटील, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील विषय विशेषज्ञ प्रा. अन्सारखान आत्तार, प्रगतशील शेतकरी श्री.प्रकाश सखाराम गायकवाड व इतर शास्त्रज्ञ, शेतकरी, कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार







