राहुरी तालुक्यातील संत गाडगे बाबा आश्रम शाळेच्या मातोश्री सखुबाई बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात संघटनेची अधिकृत स्थापना जाहीर करण्यात आली.
आदिवासी संघर्ष सेना’ची स्थापना आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच समाजातील विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी राहुरी तालुक्यात आदिवासी संघर्ष सेना या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली. राहुरी तालुक्यातील संत गाडगे बाबा आश्रम शाळेच्या मातोश्री सखुबाई बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात संघटनेची अधिकृत स्थापना जाहीर करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी, भिल्ल, गौंड व ठाकर समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते नामदेव बंडू पवार यांच्या कार्याची दखल घेत आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच आदिवासी समाजाला संघटित करण्यासाठी नामदेव पवार यांनी केलेल्या कार्याला मिळालेला हा मोठा प्रतिसाद मानला जात आहे.
संघटनेच्या स्थापनेदरम्यान विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये नामदेव बंडू पवार यांची संस्थापक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच अंकुश नामदेव पवार यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी, गुलाबनाना मोहन बर्डे यांची प्रमुख पदावर, नारायण माळी यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी, ईश्वर शेडमाके यांची महाराष्ट्र राज्य सचिवपदी तर बाबासाहेब शिंदे यांची महाराष्ट्र राज्य सल्लागारपदी निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी आदिवासी संघर्ष सेना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. संघटनेच्या माध्यमातून समाजातील युवकांना दिशा देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणे, बेरोजगारांसाठी विविध उपक्रम राबविणे तसेच शासन स्तरावर प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करणे यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अनिल जाधव रिपब्लिकन सेनेचे राजूभाऊ आढाव. नारायण माळी वंचित बहुजन आघाडी चे बाबा साठे. दत्ता पवार पैलवान पप्पू बर्डे यांच्यासह भिल्ल, गौंड, ठाकर व इतर आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नव्याने स्थापन झालेल्या संघटनेचे स्वागत करत समाजहिताच्या लढ्यात खंबीरपणे साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी ही संघटना एक प्रभावी व्यासपीठ ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार







