Homeताज्या बातम्यागुणवत्तापूर्ण कृषि उत्पादनांच्या निर्मितीतून स्वतःची ओळख निर्माण करा  विभाग प्रमुख डॉ. सुरेश...

गुणवत्तापूर्ण कृषि उत्पादनांच्या निर्मितीतून स्वतःची ओळख निर्माण करा  विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके यांचे वक्तव्य

गुणवत्तापूर्ण कृषि उत्पादनांच्या निर्मितीतून स्वतःची ओळख निर्माण करा  विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके यांचे वक्तव्य

मार्केटमध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादनाला नेहमीच मागणी असते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करा. तुमच्यामध्ये प्रखर इच्छाशक्ती आणि जोखीम पत्करण्याचे धाडस असेल तर कोणताही प्रक्रिया उद्योग तुम्ही यशस्वी करू शकता.

या प्रक्रिया उद्योगातील गुणवत्तापूर्ण कृषि उत्पादनांच्या निर्मितीतून स्वतःची ओळख निर्माण करा असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागांतर्गत पाच दिवसीय आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ. सुरेश दोडके बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड व डॉ. गणेश शेळके उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. विक्रम कड यांनी सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणानंतरही यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वापट करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आंबा फळापासून सरबत, सिरफ, स्क्वॅश, गर, लोणचे, मुरंबा, जॅम, पावडर, पन्हे, आंबा पोळी इ. विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली. याबरोबरच अन्न सुरक्षितता व मानके कायद्याची माहिती, प्रक्रिया उद्योगाची नोंदणी, उद्योगासाठी लागणारी मशिनरी, पदार्थाचे पॅकेजींग आणि मार्केटिंक, प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या योजना, अनुदान या संबंधीच्या माहितीबरोबरच यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी अहिल्यानगर, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर व मुंबई येथील 24 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल घुगे यांनी तर आभार श्री. गोरक्षनाथ चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती सविता धनवडे, श्री. पोपट खर्चे आणि श्री. सुभाष माने यांनी परिश्रम घेतले.

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

0
महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंत्री मंगल प्रभात लोढा...

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात ३० ऑक्टोंबर ला शिर्डीत महामोर्चा

0
शिर्डी : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या संघटना व समाजबांधवांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी...

राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

0
राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी  राहुरी शहरातील बाजारपेठेत हातगाडीवर तसेच रस्त्यालगत छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरील अतिक्रमणाची कारवाई सणासुदीच्या काळात तात्पुरती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

error: Content is protected !!