ASK रिअल इस्टेट उद्योग समुहाचे उद्योजक संजय प्रकाश जाधव यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने सन्मानित कारण्यात आले त्याच बरोबर दिपक रामजी साळवे यांना राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्यभरातील १२० मान्यवरांचा एकाच व्यासपीठावर गौरव
समाजहितासाठी आणि सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आधार फाउंडेशन व एसआर २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ASK रिअल इस्टेट उद्योग समुहाचे चे संस्थापक आणि न्युज 14 न्युज चॅनेल चे उपसंपादक संजय प्रकाश जाधव आणि न्युज 14 न्युज चॅनेल चे जिल्हा प्रतिनिधी दिपक साळवे यांना त्यांच्या निर्भीड आणि उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
या सोहळ्याच्या माध्यमातून राज्यभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तब्बल १२० कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा एकाच व्यासपीठावर सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक नवा मराठाचे संपादक सुभाष गुंदेचा होते. यावेळी त्र्यंबकेश्वर येथील महामंडलेश्वर मठाधिपती महंत १००८ पूजाताई नंदगिरी, खेड पंचायत समितीचे सभापती संभाजी चौधरी, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, जेष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी.शिवसेना नेते पै. रावसाहेब खेवरे, शिवसेना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा देवळाली नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष चोळके, शिवाजीराव कपाळे,जेष्ठ पत्रकार आर आर जाधव राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदास बाचकर, यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजयराव तमनर, आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा ह.भ.प. राधिका खेमनर आणि सरपंच रणजीत पगडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पत्रकार रमेश खेमनर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल डोलणार, रंगनाथ तमनर, रामचंद्र थोरात, सोमनाथ वाघ, दीपक साळवे, मनोज साळवे, जावेद शेख, सचिन सोळसे, अंकुश दवणे आणि रवी खेमनर. योगेश पवार. डॉ. देवेंद्र शिंदे.यांनी विशेष परिश्रम घेतले.
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज 14 राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार





















