Homeताज्या बातम्यामानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी पर्यावरण समृद्ध असणे गरजेचे असून प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. एक झाड लावणे म्हणजे एक भविष्य घडवणे होय असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

          बुऱ्हाणनगर ता. जि. अहिल्यानगर येथील संकल्प अकॅडमी आणि रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर इंटिग्रिटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि निलंगी गडाख संचालिका, संकल्प अकॅडमी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वृक्षारोपण झाल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. याप्रसंगी मुळा एज्युकेशन सोसायटीचे शैक्षणिक प्रमुख व एच. आर. श्री. संदीप खेडकर, रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर इंटिग्रिटीचे अध्यक्ष रोटेरियन श्री. सईद शेख, रोटरी क्लबच्या सदस्या अँड. ज्योत्स्ना ससाणे व संकल्प अकॅडमीच्या प्राचार्या श्रीमती विना मुंगी उपस्थित होत्या.

           याप्रसंगी श्री. संदीप खेडकर यांनी विद्यार्थी व मान्यवरांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले. यानंतर उपस्थित सर्वांनी पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मुबीना शेख यांनी तर आभार श्रीमती विना मुंगी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संकल्प अकॅडमीतील विद्यार्थी व शिक्षक तसेच रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यापीठ प्रतिनिधी. आर.आर.जाधव 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

0
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप राहुरी विद्यापीठ, दि. 19 ऑगस्ट, 2026 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन...

error: Content is protected !!