Homeताज्या बातम्यामहात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

 महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभरात एकाच दिवशी ५०० केंद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाअंतर्गत कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली व अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे रोजगार मेळावा उत्साहात संपन्न झाला. राहुरी कृषि विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पदव्युत्तर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यव्यापी रोजगार महाकुंभाचे ऑनलाइन उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषेदेच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे माजी उपमहासंचालक डॉ. ए.के. सिंग प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजयकुमार पाटील व पदव्युत्तर महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. सुभाष घोडके उपस्थित होते.

 यावेळी कुलगुरु डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभर रोजगार मेळावे आयोजित केले जातील. विविध कृषि महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. याप्रसंगी डॉ. ए.के.सिंग यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रोजगार मेळाव्याचे महत्व आणि उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. साताप्पा खरबडे यांनी विद्यार्थ्यांना कृषि मधील रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या रोजगार मेळाव्यासाठी विद्यापीठ परिसरातील तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्नित २२ कृषी महाविद्यालयांमधून एकूण ७९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ५६७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखतींमध्ये सहभाग घेतला. रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील ३३ नामांकित आस्थापनांनी सहभाग नोंदविला. यामध्ये बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील २२, अन्नप्रक्रिया उद्योगातील ३ आणि कृषी क्षेत्राशी संबंधित ८ कंपन्यांचा समावेश होता. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २०० हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, कृषी, अन्नप्रक्रिया, बँकिंग, फायनान्स आणि संबंधित विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी मिळाल्या आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सात्ताबा खरबडे यांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग यामुळे रोजगार मेळाव्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते.

विद्यापीठ प्रतिनिधी. आर.आर. जाधव 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात ३० ऑक्टोंबर ला शिर्डीत महामोर्चा

0
शिर्डी : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या संघटना व समाजबांधवांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी...

राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

0
राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी  राहुरी शहरातील बाजारपेठेत हातगाडीवर तसेच रस्त्यालगत छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरील अतिक्रमणाची कारवाई सणासुदीच्या काळात तात्पुरती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

error: Content is protected !!