युवा ग्रामीण पत्रकार संघाची धर्माडी गेस्ट हाऊस येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न
कार्यकारिणीच्या विविध नियुक्त्या पदोन्नती व प्रतीक संतोष बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला
राहुरी तालुक्यातील धर्माडी गेस्ट हाऊस येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीमध्ये प्रतीक संतोष बनसोडे यांची राज्य लोकसेवा आयोगात नगररचनाकार ( toun planing officer ) या पदावर निवड झाल्याबद्दल आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात १७ रँक मिळवल्या बद्दल त्यांचा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या बळकटीकरणासाठी तसेच आगामी कार्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत कार्यकारिणीतील विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या तसेच काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले होते. यावेळी जिल्हासचिव राजेंद्र म्हसे, जिल्हा सहसचिव राजेंद्र पवार, जिल्हासंघटक आर. आर. जाधव, तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक, उपाध्यक्ष दिपक मकासरे, तालुका सचिव प्रमोद डफळ, सहखजिनदार जावेद शेख, खजिनदार कमलेश विधाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून दिनेश गायकवाड, अप्पासाहेब मकासरे, देवेंद्र शिंदे, अनिकेत विधाटे, दिपक साळवे, उमेश बाचकर, प्रशांत जोशी यांच्यासह अनेक पत्रकार सदस्य उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या विस्ताराबाबत, ग्रामीण भागातील पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारांच्या हक्क व संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीच्या शेवटी उपस्थित सदस्यांनी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन केले. सर्व उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली.
दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14 राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार







