News 14 चॅनेलच्या कार्यकारी संपादक पदी दिपक साळवे यांची निवड आणि विद्यापीठ प्रतिनिधीपदी आर. आर. जाधव यांची नियुक्ती तर दिपक मकासरे यांचे निलंबन
राहुरी, दि. १ जुलै News 14 या न्यूज चॅनेलच्या कार्यकारी संपादक या पदी दिपक रामजी साळवे यांची नियुक्ती करण्यात आली त्याच बरोबर विद्यापीठ प्रतिनिधीपदी आर. आर. जाधव यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय दिनांक ३० जून रोजी झालेल्या चॅनेलच्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस मुख्य संपादक ऋषी पोळ, संपादक संजय जाधव तसेच कार्यकारी संपादक दिपक साळवे उपस्थित होते. बैठकीत विद्यापीठ प्रतिनिधी पदासंदर्भात सविस्तर चर्चा करून सर्वानुमते आर. आर. जाधव यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले दिपक मकासरे हे गेल्या तीन वर्षांपासून News 14 चॅनेलमध्ये कार्यरत होते. मात्र, नियमितपणे बातम्या न पाठविणे, News 14 व्यतिरिक्त इतर चॅनेलच्या बातम्या स्वतःच्या नावाने प्रसारित करणे, चॅनेलला कोणतीही पूर्वकल्पना न देता दुसऱ्या न्यूज चॅनेलमध्ये कार्य करणे तसेच त्या माध्यमातून बातम्यांचे प्रसारण करणे अशा विविध कारणांमुळे त्यांची प्रतिनिधीपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्य संपादक ऋषी पोळ आणि संपादक संजय जाधव कार्यकारी संपादक दिपक साळवे यांनी जाहीर केले.
आणि News 14 या चॅनेलशी दिपक मकासरे यांचा कोणताही एक संबंध राहणार नाही याची विद्यापीठ प्रशासनाणे नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले
दरम्यान, नव्याने नियुक्त करण्यात आलेले विद्यापीठ प्रतिनिधी आर. आर. जाधव हे News 14 चॅनेलच्या माध्यमातून विद्यापीठाशी संबंधित घडामोडी, शैक्षणिक उपक्रम आणि विविध बातम्यांचे नियमित व वस्तुनिष्ठ वार्तांकन करतील, असा विश्वास चॅनेल व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
दिपक साळवे सह योगेश पवार News 14 राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार





















