लाईफ इन हॉस्पिटल चे डॉ. प्राजक्त संदीप हिवाळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड – २०२६ जाहीर
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. प्राजक्त संदीप हिवाळे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड २०२६ साठी निवड करण्यात आली आहे.याबाबतचे मंजुरीपत्र २३ जुलै २०२६ रोजी भारत सेंटर फॉर व्होकेशनल ट्रेनिंग, तामिळनाडू यांच्या वतीने प्रदान करण्यात आले आहे. पत्रानुसार, डॉ. हिवाळे यांची सर्वोत्तम सार्वजनिक सेवा या श्रेणीत निवड करण्यात आली असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा आंतरराष्ट्रीय सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या पत्रात त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत भविष्यात समाजहितासाठी आणखी प्रभावी कार्य करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत या
पुरस्कारासाठी सन्मानित झाल्याबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. प्राजक्त हिवाळे यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




