वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीची पुणे न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या कारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशच न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या कार्यकाळात कृषी विद्यापीठातील प्रशासकीय कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. भ्रष्टाचाराचे तण तर न्यायाल प्रचंड माजले आहे. बेशिस्त कारभाराला वेसण पोलिसां घालण्याऐवजी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांचा आदेश एक पाय देशात आणि दुसरा कायम परदेशात असतो. कुलगुरूंच्या बेजबाबदार कारभाराचे माध्यमांतून अनेकदा वाभाडे काढण्यात आले. परंतु कोडगेपणाची झालर पांघरूण डॉ. इंद्र मणी कुलगुरूपदाला चिकटून राहिले. पुणे येथील एका जागरूक नागरिकाने वसंतरावनाईक कृषी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात थेट न्यायालयात दाद मागितली. आपल्या याचिकेसोबत त्याने कुलगुरूंनी परदेश दौऱ्यावर केलेली उधळपट्टी, कुलसचिव संतोष वेणीकर यांनी चव्हाट्यावर आणलेला ५६ कोटी रुपयांचा घोटाळा, नऊ कोटी रुपयांच्या निविदेत झालेली अनियमितता, विद्यापीठातील अर्धवट कामे, फुगवलेली कामाची बिले, मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर करण्यात आलेला अन्याय, प्रा. डॉ. नीता गायकवाड यांनी मागासवर्गीय आयोगाकडे केलेली तक्रार आणि आयोगाने केलेली कारवाई हा सर्व लेखाजोखा तक्रारीसोबत न्यायालयासमोर मांडला. या तक्रारीची गंभीर दखल घेत पुणे न्यायालयाने बीएनएस कलम १७५ (३) अंतर्गत डॉ. इंद्र मणी यांच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
विद्यापीठ प्रतिनिधी. आर.आर. जाधव

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




