महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पाणी फाउंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न डिजीटल शेतीशाळा हे कृषि विस्ताराचे प्रभावी माध्यम आहे असे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सांगितले
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि पाणी फाउंडेशन यांच्यात फार्मर कप व डिजीटल शेतीशाळेसाठी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे आणि पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्यजीत भटकळ यांनी करारावर स्वाक्षर्या केल्या.
यावेळी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरवडे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील कदम, पाणी फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी नामदेव ननावरे, कार्यक्रम समन्वयक विक्रम फाटक उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अतिशय तळमळीने शेतकर्यांना मार्गदर्शन करत असतात. शास्त्रज्ञ पाणी फाउंडेशनच्या या उपक्रमामध्ये नेहमीच सहभागी असतात. विद्यापीठ व पाणी फाउंडशेन यांच्यामार्फत शेतकर्यांना मार्गदर्शन करण्याचे काम राज्यभर सुरु आहे. शेतकर्यांसाठी काम करण्यासाठी खुप मोठा वाव आहे. एकात्मिक शेती पध्दती प्रत्यक शेतकर्यांपर्यंत जाणे गरजेचे आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाद्वारे विविध नाविण्यपूर्ण विस्तार उपक्रम सुरु केले आहे फुले समृध्द गावामध्ये पाणी फाउंडेशनची डिजीटल शेतीशाळेच्या उपक्रमाचा समावेश व्हावा. डिजीटल शेतीशाळा हे कृषि विस्ताराचे प्रभावी माध्यम आहे.
प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की, कृषि विद्यापीठ हे नॉलेज पार्टनर म्हण्ाुन पाणी फाउंडेशनबरोबर काम करत आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विविध माध्यमांद्वारे शेतकरी गटांना शेती विषयक तांत्रिक मार्गदर्शन व सल्ला देत आहेत. विविध कृषि तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण साहित्य निर्मिती करुन शेतकर्यांना मार्गदर्शन करत आहे. सत्यजीत भटकळ मार्गदर्शन करतांना म्हणाले की रोजच्या डिजीटल शेतीशाळेव्यतीरिक्त पाणी फाउंडेशनद्वारे आयोजीत फार्मर कपमध्ये आठवड्यातून एकदा सहभागी शेतकरी गटांना व्हिडीओ कॉलद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. यामध्ये कृषि विभाग, उमेद कर्मचारी यांची मदत घेत आहे. कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा सहभाग पाणी फाउंडेशनच्या या कामामध्ये होणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले.
विद्यापीठ प्रतिनिधी. आर.आर.जाधव

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




