दुःखद निधन
धामोरी खुर्द येथील अर्जुन बाळाजी जाधव यांचे दुःखद निधन धामोरी खुर्द येथील रहिवासी अर्जुन बाळाजी जाधव यांचे दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
जाधव हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून सेवेतून सेवानिवृत्त झाले होते. अत्यंत मनमिळावू व प्रेमळ स्वभावामुळे ते धामोरी पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार आर. आर. जाधव यांचे ते चुलते होत.त्यांच्या निधनाने जाधव कुटुंबीयांवर तसेच मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
.भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
विद्यापीठ प्रतिनिधी.आर.आर.जाधव

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार







