Homeताज्या बातम्याराहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

 राहुरी शहरातील बाजारपेठेत हातगाडीवर तसेच रस्त्यालगत छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरील अतिक्रमणाची कारवाई सणासुदीच्या काळात तात्पुरती स्थगित करून ती दिवाळीनंतर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत राहुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिपक रामजी साळवे, भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन जिल्हाध्यक्ष, अहिल्यानगर आणि देवेंद्र रमेश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राहुरी शहरातील अनेक छोटे व्यावसायिक हातगाडी तसेच रस्त्यालगत किरकोळ व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नवरात्र, दसरा, दिवाळी आदी सणांच्या पार्श्वभूमीवर हे व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभे करतात. काही व्यावसायिक कर्ज किंवा बचत गटाच्या माध्यमातून पैसे उभे करून सणासुदीच्या काळात व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करतात.

अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात अतिक्रमण कारवाई झाल्यास छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

त्यामुळे सणासुदीच्या काळात छोट्या व्यावसायिकांवर कारवाई न करता दिवाळीचा सण संपल्यानंतर अतिक्रमणाबाबतची कारवाई करण्यात यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नगरपरिषद प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून छोट्या व्यावसायिकांना सणासुदीच्या काळात व्यवसाय करण्यासाठी दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.

दिपक साळवे News 14 राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

error: Content is protected !!