Homeताज्या बातम्यामहात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट संशोधन...

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार 

जम्मू येथील शेर-ए-काश्मीर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 41 व्या वार्षिक बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे विभागातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (पीक शास्त्र) डॉ. डि.के. यादव आणि जम्मू येथील शेर-ए-काश्मीर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.एन. त्रिपाठी यांच्या शुभहस्ते व नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक (बियाणे) डॉ. पी.आर. चौधरी, उत्तर प्रदेशातील मऊ येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय बियाणे विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. ए. आनंदन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नरेंद्र काशीद, बियाणे संशोधन अधिकारी डॉ. सुरेश झांजरे, डॉ. कैलास भोईटे, डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. अविनाश कर्जुले, डॉ. रश्मी भोगे, डॉ. कैलास गागरे आणि डॉ. दीपक गायकवाड यांनी स्वीकारला. या वार्षिक आढावा बैठकीत बियाणे रोगशास्त्र विषयातील दोन, बियाणे प्रक्रिया या विषयातील एक, बीजोत्पादन व प्रमाणिकरण या विषयातील एक, बियाणे कीटकशास्त्र या विषयातील एक अशा एकूण पाच शिफारशी राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आल्या आहेत. या आधी या बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेने राष्ट्रीय स्तरावर 68 तर राज्य स्तरावर 27 तंत्रज्ञान शिफारशी शेतकर्यांसाठी प्रसारीत केल्या आहेत. या योजनेस तीन वेळा राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात आले आहे. बीजोत्पादनातील विविध अडचणी समोर ठेवून त्यासंदर्भातील नियोजन व संशोधन कार्यात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके तसेच सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार यांचे बहुमोल मार्गदर्शन व बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेच्या शास्त्रज्ञांनी या संदर्भात केलेल्या संशोधनकार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी या योजनेतील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. या योजनेला पुरस्कार मिळाल्याबद्दल या योजनेतील सर्व शास्त्रज्ञांची विद्यापीठाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

0
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप राहुरी विद्यापीठ, दि. 19 ऑगस्ट, 2026 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन...

error: Content is protected !!