Homeताज्या बातम्याउद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती विषयक जनजागृती कार्यशाळाचे आयोजन

उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती विषयक जनजागृती कार्यशाळाचे आयोजन

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे एक दिवसीय “उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती” या विषयावर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दि. 7 जुलै,2026 रोजी करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा कृषि विद्यापीठाच्या डॉ.नानासाहेब पवार सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे हे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ॲग्रीप्लास्ट टेक इंडिया प्रा. लि., बेंगळुरूचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी इंजि. राजीब कुमार रॉय तसेच सह्याद्री फार्म्स, नाशिकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विलास शिंदे उपस्थित राहणार आहेत.या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृ.) डॉ. साताप्पा खरबडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेचे संयोजक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एम. नलावडे आणि उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील असून कार्यशाळेचे समन्वयक डॉ. विक्रम कड, डॉ. सुनील कदम, डॉ. नितीन दाणवले आणि डॉ. जितेंद्र ढेमरे आहेत.कार्यशाळेमध्ये संदीप शिंदे आणि प्रमोद राजेभोसले हे उच्च तंत्रज्ञान शेतीतील संधी, शेतीमधील उद्योजकतेची गरज, स्टार्टअप्ससाठी इन्क्युबेशन सहाय्य व्यवस्था तसेच कृषी पदवीधरांसाठी ‘ग्रोथ माइंडसेट’ यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि कृषी क्षेत्रातील इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. विक्रम कड यांनी केले आहे.

विद्यापीठ प्रतिनिधी. आर आर जाधव 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

error: Content is protected !!