अफवा पसरवल्याच्या संशयातून इलेक्ट्रिक दुकानात मारहाण; एक जखमी
गावात आपल्याबाबत अफवा पसरवल्याच्या संशयातून मन्सूर मोहम्मद पठाण व्यक्तीने इलेक्ट्रिक दुकानात घुसून दुकानमालकास मारहाण केल्याची घटना रविवारी ३१ मे रोजी दुपारी राहुरी शहरातील नवी पेठ, गोकुळ कॉलनी येथे घडली. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अबरार अब्दुल कहार वय ४२, रा. मुनिरनगर, राहुरी यांचे नवी पेठ गोकुळ कॉलनी येथे इलेक्ट्रिकचे दुकान आहे. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते दुकानात असताना त्यांचा परिचित मन्सूर मोहम्मद पठाण रा. मुलनमाथा, ता. राहुरी हा तेथे आला. “तू माझ्याबाबत गावात अफवा पसरवितोस,” असा आरोप करत त्याने शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.यावेळी वाद वाढल्यानंतर आरोपीने दुकानातील काउंटरवर ठेवलेला मिक्सर उचलून शेख यांच्या नाकावर मारल्याने ते जखमी झाले. तसेच दुकानातील काउंटरजवळ असलेला कुलर तोडून नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.घटनेदरम्यान भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुजफ्फर गफूर कादरी व सत्तार गुलाब शेख दोघे रा. राहुरी यांनाही आरोपीने शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच निघून जाताना आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी शेख अबरार कहार यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात मन्सूर मोहम्मद पठाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील मारहाण, दुखापत, धमकी, शिवीगाळ व मालमत्तेचे नुकसान यासंदर्भातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय विठ्ठल नवाळे करीत आहेत.
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




