Homeताज्या बातम्याख्रिस्ती धर्माची बदनामीचे षड्यंत्र थांबवावे :- ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समिती

ख्रिस्ती धर्माची बदनामीचे षड्यंत्र थांबवावे :- ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समिती

 श्रीरामपूर (प्रतिनिधी)– सध्या महाराष्ट्रातच नव्हेतर एकूणच देशामध्ये ख्रिस्ती धर्म आणि ख्रिस्ती समाजावर अन्याय,अत्याचाराच्या व बदनामीच्या घटना वाढत आहेत. सदर घटनांना आळा बसावा, त्या पुर्णतः था़बविल्या जाव्यात याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,समाज माध्यमातून समजलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर येथे घडलेल्या कथित धर्मा़ंतर प्रकरणातील आरोपी मोहन आडांगळे व व्यंकटेश अडांगळे यांनी एका पीडित मुलीला बळजबरीने चर्च मधले पाणी पाजून, तिला ख्रिस्ती धर्माचे पालन करण्याकरिता, बायबलच्या पाया पडायला सांगितले व तिचा विनयभंग केला. असे वृत्त कोणतीही शहानिशा न करता प्रसृत करण्यात आले.

वस्तुतः उपरोक्त उल्लेखित दोनही आरोपी हे ख्रिश्चन नाहीत. याउपरांत वृत्त कथनात दाखविलेला प्रकार हा ख्रिस्ती धर्म किंवा धार्मिक विधीनुसार अशा प्रकारचे कोणतेही कृत्य केले जात नाही हे महत्त्वाचे आहे.
ख्रिस्ती धर्माच्या नावाखाली असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींची निखालस चौकशी होऊन योग्य ती कारवाई करावी. मात्र अशा प्रकारे ख्रिस्ती धर्माला बदनाम करण्याचे षड़यंत्र थांबवले जावे असेही निवेदनात म्हटले आहे.

तरीही वरील घटनेची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कार्यवाही व्हावी. तसेच आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणारी व्यक्ती वा व्यक्तीसमुह यांना कायद्याने बाधित करण्यात यावे आणि ख्रिस्ती समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी यावेळी सोमनाथ वाकचौरे यांचेकडे करण्यात आली . यावेळी
प्रविण‌राजे शिंदे,निखिल भोसले,दिपक कदम, रेव्हरंट अण्णासाहेब अमोलिक, पास्टर पिटर बनकर ,रवींद्र लोंढे, सुनिल बोरगे,एस.पी.पंडित, प्रकाश निकाळे, फ्रान्सिस साळवे, कार्तिकी चांदेकर, अजय गायकवाड, निशिकांत पंडित ,शैलेश अमोलिक, विजय त्रिभुवन ,इग्नाती रूपटक्के, सुभाष खरात संतोष तुपे सागर जोगदंड बबन जाधव राजेश खडक सुरेश ठुबे,विजय बार्शे, बाळासाहेब जाधव,विल्सन बोर्डे आदी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

error: Content is protected !!