Homeताज्या बातम्यामहात्मा फुले कृषि विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागांतर्गत आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. 2 ते 6 जून, 2026 या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या शुभहस्ते होणार आहे.प्रशिक्षणामध्ये आंब्यापासून विविध पदार्थ निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना भविष्यात आपला उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती ज्यामध्ये आंबा गर साठवणे, कैरी लोणचे व पन्हे, आंबा सरबत, सिरप, स्क्वॅश, आंबा पावडर, आमचूर, जॅम तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर अन्न सुरक्षितता व मानके कायद्याची माहिती, प्रक्रिया उद्योगाची नोंदणी, उद्योगासाठी लागणारी मशिनरी व त्यांची देखभाल, पदार्थांचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग, प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या कर्ज योजना, अनुदान यासंबंधीची माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी दि. 28 मे, 2026 पर्यंत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या कार्यालयाशी (02426) 243259 तसेच कार्यालय प्रतिनिधी श्री. राहुल घुगे 9421437698 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड यांनी केले आहे. 

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

error: Content is protected !!