राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे ग्रामपंचायत मार्फत घरकुल मंजूर करून घरकुल न बांधता शासनाची आर्थिक फसवणूक
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे ग्रामपंचायत मार्फत घरकुल मंजूर करून घरकुल न बांधता शासनाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी शासकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी २२ जून रोजी जिल्हा परीषद कार्यालया समोर प्राणांतिक आमरण उपोषण करण्यात येईल. असे निवेदन यमुना भालेराव यांनी दिले. राहुरी येथील राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनच्या जिल्हाध्यक्षा यमुना देवराव भालेराव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायत अंतर्गत सन 2024-25 रमाई घरकुल योजने अंतर्गत लाभार्थी प्रदिप गंगाधर विधाटे, महेश गंगाधर विधाटे यांनी घरकुल घरकुल मंजूर करून घेतले. मात्र घरकुल न बांधता शासनाची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी ग्रामसेवक शिवाजी पटेकर, इंजिनिअर ब्राम्हणे, ग्राम रोजगार कर्मचारी पुजा संतोष झावरे यांच्यावर पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल करावा. तसेच ग्रामसेवक पटेकर यांस निलंबित करण्यात यावे. या मागण्यासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा परीषद कार्यालया समोर दि. २२ जून २०२६ रोजी प्राणांतिक आमरण उपोषण करण्यात येईल. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही, तो पर्यंत उपोषण चालू ठेवणार अशी माहिती यमुना भालेराव यांनी दिली.
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




