Homeताज्या बातम्यामहात्मा फुले कृषी विद्यापीठ–एसआयआयएलसीमध्ये सामंजस्य करार संपन्न

महात्मा फुले कृषी विद्यापीठ–एसआयआयएलसीमध्ये सामंजस्य करार संपन्न

पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून कौशल्याधारित उपक्रमांवर भर कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे सुतोवाच   

कृषी क्षेत्रातील कौशल्य विकास, शिक्षण, संशोधन आणि उद्योगाभिमुख उपक्रमांना नवी दिशा देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पुणेस्थित सकाळ व ॲग्रोवन संलग्न नामांकित कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी (SIILC) यांच्यात दीर्घकालीन सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे आणि एसआयआयएलसीचे उपसरव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरवडे, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कृषी तंत्रज्ञानाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र हिले, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुनील कदम, प्रकल्प प्रमुख मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले, “महात्मा फुले कृषी विद्यापीठ १२५ हून अधिक पिकांवर संशोधन व विकासाचे काम करत असून आतापर्यंत विविध पिकांचे ३२० वाण, ५५ कृषी यंत्रे आणि २,००० हून अधिक तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यात आल्या आहेत. आज शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर कौशल्याची आवश्यकता आहे. या सामंजस्य करारामुळे शेतकरी, महिला शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य घटकांना कौशल्याधारित प्रशिक्षण उपलब्ध होऊन उद्योजकतेला चालना मिळेल आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यास मदत होईल.”

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की, “पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून विविध कौशल्याधारित उपक्रम संयुक्तपणे राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. याचा लाभ कृषी व संलग्न क्षेत्रातील मनुष्यबळासह विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि उद्योजकांना होणार आहे.”

एसआयआयएलसीचे उपसरव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी सांगितले की, उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणारे प्रमाणपत्र, डिप्लोमा आणि अद्ययावत कौशल्य विकास अभ्यासक्रम संयुक्तपणे राबविण्यात येतील. तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स, इनोव्हेशन हब, उद्योजकता विकास केंद्र आणि इनक्युबेशन उपक्रमांच्या माध्यमातून नवकल्पना व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

*शेतकरी प्रशिक्षणापासून स्टार्टअप्सपर्यंत सहकार्य*
या सामंजस्य करारांतर्गत केंद्र व राज्य शासन, ICAR तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे विविध प्रकल्प संयुक्तपणे राबविण्यात येणार आहेत. याशिवाय शेतकरी प्रशिक्षण, उद्योजकता कार्यशाळा, परिसंवाद, प्रदर्शन, परिषदा आणि तांत्रिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या सहकार्यामुळे कृषी क्षेत्रातील कौशल्याधारित शिक्षणाला बळ मिळून रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. कृषी शिक्षण, संशोधन, उद्योग आणि कौशल्य विकास यांना एकत्र आणणारा हा करार कृषी क्षेत्रातील युवा पिढीसाठी विशेषतः महत्त्वपूर्ण ठरणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. मृणाल आजोतीकर यांनी मानले.

      कृषी क्षेत्रातील कौशल्य विकास, शिक्षण, संशोधन आणि उद्योगाभिमुख उपक्रमांना नवी दिशा देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पुणेस्थित सकाळ व ॲग्रोवन संलग्न नामांकित कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी (SIILC) यांच्यात दीर्घकालीन सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे आणि एसआयआयएलसीचे उपसरव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरवडे, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कृषी तंत्रज्ञानाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र हिले, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुनील कदम, प्रकल्प प्रमुख मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले, “महात्मा फुले कृषी विद्यापीठ १२५ हून अधिक पिकांवर संशोधन व विकासाचे काम करत असून आतापर्यंत विविध पिकांचे ३२० वाण, ५५ कृषी यंत्रे आणि २,००० हून अधिक तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यात आल्या आहेत. आज शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर कौशल्याची आवश्यकता आहे. या सामंजस्य करारामुळे शेतकरी, महिला शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य घटकांना कौशल्याधारित प्रशिक्षण उपलब्ध होऊन उद्योजकतेला चालना मिळेल आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यास मदत होईल.”

प्रस्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की, “पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून विविध कौशल्याधारित उपक्रम संयुक्तपणे राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. याचा लाभ कृषी व संलग्न क्षेत्रातील मनुष्यबळासह विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि उद्योजकांना होणार आहे.” आयआयएलसीचे उपसरव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी सांगितले की, उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणारे प्रमाणपत्र, डिप्लोमा आणि अद्ययावत कौशल्य विकास अभ्यासक्रम संयुक्तपणे राबविण्यात येतील. तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स, इनोव्हेशन हब, उद्योजकता विकास केंद्र आणि इनक्युबेशन उपक्रमांच्या माध्यमातून नवकल्पना व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

शेतकरी प्रशिक्षणापासून स्टार्टअप्सपर्यंत सहकार्य

या सामंजस्य करारांतर्गत केंद्र व राज्य शासन, ICAR तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे विविध प्रकल्प संयुक्तपणे राबविण्यात येणार आहेत. याशिवाय शेतकरी प्रशिक्षण, उद्योजकता कार्यशाळा, परिसंवाद, प्रदर्शन, परिषदा आणि तांत्रिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सहकार्यामुळे कृषी क्षेत्रातील कौशल्याधारित शिक्षणाला बळ मिळून रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. कृषी शिक्षण, संशोधन, उद्योग आणि कौशल्य विकास यांना एकत्र आणणारा हा करार कृषी क्षेत्रातील युवा पिढीसाठी विशेषतः महत्त्वपूर्ण ठरणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. मृणाल आजोतीकर यांनी मानले.

विद्यापीठ प्रतिनिधी. आर.आर. जाधव 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

0
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप राहुरी विद्यापीठ, दि. 19 ऑगस्ट, 2026 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन...

error: Content is protected !!