तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दोन गटांत राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात तुंबळ हाणामारी
दिनांक १४ मे रोजी दुपारच्या दरम्यान तुंबळ मारहाण झाल्याची घटना घडली. या घटमुळे पोलीस प्रशासनाची काही काळ चांगलीच धावपळ झाली. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील गणपतवाडी येथे अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याच्या संशयावरून दोन गटांत वाद झाले. दि. १४ मे २०२६ रोजी दुपारी २.१५ वाजे दरम्यान दोन्ही गट राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. पोलीस ठाण्याच्या गेट समोर दोन्ही गटांत सुरुवातीला शाब्दिक वाद झाले. त्यानंतर धक्काबूक्की झाली. काही वेळात दोन्ही गटातील महिला पुरुषांनी एकमेकांना लाथा बूक्क्यांनी मारहाण सुरु केली. यावेळी मोठा आरडा ओरडा झाल्याने पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ बाहेर येऊन मारहाण करणाऱ्या लोकांना चांगलेच बदडून काढले. त्यानंतर चार ते पाच जणांना ताब्यात घेतले . या घटने बाबत दुपारी उशीरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नव्हता. सदर घटना ही अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याच्या संशयावरून झाल्याची चर्चा सुरु आहे. पोलीस प्रशासनाने या घटने बाबत सखोल चौकशी करावी. तसेच अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणारे नातेवाईक व इतर लोकांवर तात्काळ कारवाई करुन गुन्हा दाखल करावा. अशी मागणी जनतेमधून होत आहे.
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




