अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक थांबवा. हायकोर्टात याचिका दाखल.
नेमकं प्रकरण काय? अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक थांबवा.आधी जिल्हापरिषद निवडणुका घ्या. अशी याचिका थेट उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.श्रीरामपूरचे निवृत्त हवाई दल अधिकारी बाळासाहेब उंडे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 9 जून रोजी सुनावणी होणार आहे. याचिकेत म्हटलं आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अजून झालेल्या नाहीत. त्यामुळे 75 जिल्हापरिषद सदस्य आणि 14 पंचायत समिती सभापतींच्या जागा सध्या रिक्त आहेत. सध्या संपूर्ण कारभार प्रशासकांकडे आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यात सुमारे 80% जनता ग्रामीण भागात राहते. पण ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्यच अस्तित्वात नसल्याने विधानपरिषद निवडणुकीत त्यांचा सहभाग राहणार नाही. असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.याचिकाकर्त्यांच्या मते, अशा परिस्थितीत निवडून येणारा प्रतिनिधी हा प्रामुख्याने नागरी भागातील मतदारांचे प्रतिनिधित्व करेल.त्यामुळे ग्रामीण जनतेच्या प्रतिनिधित्वाच्या अधिकारावर परिणाम होत असल्याचा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला आहे.
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




