कारवाई संशयाच्या भोवऱ्यात, अद्याप गुन्हा दाखल नसल्याने चर्चेला आले उधाण.
अन्न व औषध प्रशासनाने राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे छापा टाकून दुधात भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र या घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप राहुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे सदर कारवाई बाबत तालूक्यात चर्चेला उधाण आले आहे.या बाबत समजलेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी रात्री गुप्त माहितीच्या आधारे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या कारवाईत दुधात भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि पावडरचा साठा आढळून आल्याचे समजले. या कारवाई बाबत अन्न व औषध प्रशासनाकडून अद्याप गुन्हा दाखल केला नाही. किंवा कोणतीही अधिकृत माहिती अथवा प्रेसनोट प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार राज्यभर दुध भेसळ विरोधात कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात कृत्रिम दूध व भेसळी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली होती. यामध्ये राहुरी तालुक्यातील प्रमोद घोरपडे, प्रकाश कडू, अजित कारंडे यांना आरोपी करण्यात आले.टाकळीमिया येथील मोरवाडी परिसरातील प्रमोद घोरपडे याला मंचर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर टाकळीमिया येथे पथकाने कारवाई केली.मात्र सदरची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात आली असुन पथकाने नेमकी काय कारवाई केली हे समजू शकले नाही. तसेच या बाबत अद्याप गुन्हा दाखल नसल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




