Homeताज्या बातम्याप्रति आवर्तन २४ हेक्टरला मिळणार एक कोटी लिटर पाणी - डॉ. सुजय...

प्रति आवर्तन २४ हेक्टरला मिळणार एक कोटी लिटर पाणी – डॉ. सुजय विखे पाटील

आश्‍वी | – “निळवंडे लाभक्षेत्रातील अनेक भागाला अद्याप पाण्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पाणी वाटपासाठी लवकरच स्वतंत्र ‘पाणी वाटप संस्था’ स्थापन केली जाणार आहे. या संस्थेच्या चेअरमनपदी त्या क्षेत्रातील सर्वात मोठे क्षेत्र असणारा शेतकरी असेल. तसेच आठ-आठ हेक्टरचे तीन गट करून एका आवर्तनात प्रत्येक गटाला ३० लाख लिटर पाणी दिले जाईल. अशा प्रकारे २४ हेक्टरला एका आवर्तनात पाईपद्वारे तब्बल एक कोटी लिटर पाणी पुरवण्यात येईल.” असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

​संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथे शुक्रवारी (दि. १०) शिर्डी विधानसभा मतदारसंघ स्तरीय आढावा व समन्वय बैठक तसेच मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) बैठक पार पडली. यामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. विखे पाटील बोलत होते. ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर, कैलास तांबे, मच्छिंद्र थेटे, आर. डी. कदम, विजय म्हसे, भगवान इलग, कांचनताई मांढरे, रोहिनीताई निघुते, तबाजी मुन्तोडे, अजय ब्राम्हणे, गोकुळ दिघे, दिलिप मुन्तोडे, सतिश जोशी, शिवाजी इलग, भारत गिते, अशोक जऱ्हाड यांच्यासह २८ गावातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, बीएलओ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, निळवंडे धरणाचे पाणी प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पाईपलाईनचे जाळे विणावे लागेल. ऑटोमेशनची योजना रद्द करून त्यातून वाचणारे ६० कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या थेट उपयोगासाठी वळवले असून यातून शेततळ्यांचे आच्छादनासाठी लागणाऱ्या प्लास्टिक कागदासाठी शेतकऱ्यांना ६० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यामुळे आवर्तन संपल्यानंतरही शेततळ्याच्या माध्यमातून दोन महिने शेतीला पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. तसेच, मॅन्युअल व्हॉल्व्हच्या तीन पाईपामध्ये आणखीन एक पाईप जोडून ओव्हरफ्लोचे पाणी प्रत्येक गावातील शेततळ्यात सोडण्याचे नियोजन मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.

निमगावजाळी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘बिबट सफारी’ प्रकल्पासाठी सुरवातीला १५ कोटी मंजूर झाले आहेत. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर त्याचे काम लवकरच सुरू होईल. तसेच, निझर्णेश्‍वर मंदिर परिसरात प्राणी संग्रहालय उभारण्याचा प्रस्तावही सरकारला पाठवण्यात येणार असल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले. यामुळे स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि यातून अर्थकारणाला मोठी चालणा मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी​ प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी दीडशे कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच कालवा आणि पोटचाऱ्याच्या कामांना गती मिळणार असल्याचे देखील सांगितले.

भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “विखे पाटील परिवाराचे अस्तित्व भाजपमुळे आहे. त्यामुळे पक्षाचे सर्व कार्यक्रम पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नियमितपणे पार पाडावेत अशा सूचना दिल्या. तसेच भाजप सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. असे आवाहन केले.

दरम्यान, डॉ. विखे पाटील यांनी ​यावेळी मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाबाबतही मार्गदर्शन केले. ते म्हणाले “२००२ आणि २०२४ च्या यादीतील नावे आणि मतदारांची समांतर पडताळणी पूर्ण झाली असून, सध्या सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मध्ये सर्वांनी नोंदणी करावी. यामधून कोणीताही पात्र व्यक्ती सुटणार नाही अपात्र व्यक्ती फॉर्म भरणार नाही. याची खबरदारी बीएलओ आणि कार्यकर्त्यानी अचूक पार पडावी, यासाठी योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

error: Content is protected !!