Homeताज्या बातम्यामहात्मा फुले कृषि विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शेती शाश्वत...

महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शेती शाश्वत करण्यासाठी आंबा महत्त्वाचे फळपीक.कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे वक्तव्य 

महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शेती शाश्वत करण्यासाठी आंबा महत्त्वाचे फळपीक.कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे वक्तव्य 

महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत फळ प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणे घेण्यात येतात. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय निर्माण करून उद्योजक होणार्या लोकांच्या यशोगाथा तयार करायला हव्यात. आपला देश शेतीप्रधान देश आहे.

आपला महाराष्ट्र उद्यानविद्येमध्ये अग्रेसर असून आपली शेती शाश्वत करण्यासाठी शेतीला फळप्रक्रियेची जोड देणे आवश्यक आहे. या दृष्टीने शेती शाश्वत करण्यासाठी आंबा फळपीक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागांतर्गत पाच दिवसीय आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम कड व प्रक्रिया अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे उपस्थित होते. यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणाले की सध्या प्रक्रिया उद्योगाला मोठे महत्त्व आले आहे. भविष्यात उद्योजक बनण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणामध्ये शिकवण्यात येणार्या सर्व विषयांचे ज्ञान आत्मसात करा. या प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या ज्ञानाने इतर लोकांना प्रोत्साहित करा त्यामुळे भविष्यात आंबा पिकामध्ये चांगले उद्योजक निर्माण होतील असे यावेळी ते म्हणाले. डॉ. साताप्पा खरबडे मार्गदर्शन करताना म्हणाले की फळ प्रक्रिया प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकर्यांना फळ प्रक्रिया उद्योग एक उत्तम शेतीपुरक व्यवसाय ठरू शकतो. हे 5 दिवसीय प्रशिक्षण निश्चितच शेतीपूरक व्यवसायासाठी महत्त्वाचे ठरेल असे यावेळी ते म्हणाले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती ज्यामध्ये आंबा गर साठवणे, कैरी लोणचे व पन्हे, आंबा सरबत, सिरप, स्क्वॅश, आंबा पावडर, आमचूर, जॅम तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर अन्न सुरक्षितता व मानके कायद्याची माहिती, प्रक्रिया उद्योगाची नोंदणी, उद्योगासाठी लागणारी मशिनरी व त्यांची देखभाल, पदार्थांचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग, प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या कर्ज योजना, अनुदान यासंबंधीची माहिती दिली जाणार आहे.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विक्रम कड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल घुगे यांनी तर आभार श्री.गोरक्षनाथ चौधरी यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी व प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले 22 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

error: Content is protected !!