Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी विद्यापीठातील फोरम उपयुक्त ठरतील कुलगुरु डॉ. विलास खर्चे...

विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी विद्यापीठातील फोरम उपयुक्त ठरतील कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचे वक्तव्य 

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी विद्यापीठातील फोरम उपयुक्त ठरतील कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचे वक्तव्य

 शेती शाश्वत करण्यासाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रभावी ठरणार असून यामध्ये कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांमध्ये खुप मोठी क्षमता आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. यासाठी विद्यापीठामध्ये स्पर्धात्मक परिक्षा, कृषि उद्योजकता व शेतीमधील उच्च तंत्रज्ञान या तीन फोरमची स्थापना करण्यात आली असून हे फोरम विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सन २०२५/या वर्षाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. विलास खर्चे बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे येथील बोल्डनेट इंडिया करिअर सर्व्हीसेस या संस्थेचे संचालक इंजि. अविनाश देशमुख उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाचे प्रमुख डॉ. महानंद माने व विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. कैलास कांबळे उपस्थित होते.

 कुलगुरु डॉ. विलास खर्चे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. हा त्यांच्या आयुष्यामधील अभिमानाचा क्षण म्हणावा लागेल. विद्यापीठाने शेती संशोधनामध्ये फार मोठे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. शेतकरी हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतात वापरत आहेत. या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे कारण दुसरी हरितक्रांती ही कृषि अभियांत्रिकीचे विद्यार्थीच करतील असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. यावळी इंजि. अविनाश देशमुख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की फक्त स्पर्धा परिक्षांवर अवलंबून न राहता आपली क्षमता ओळखुन काम करा. कृषि क्षेत्रातील शिक्षण न घेतलेले कृषि उद्योजक होत आहेत. तुम्ही तर या शेती क्षेत्रात शिक्षण घेत आहात. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला शोधा. तुमच्यातील कोणत्याही एका क्षमतेला विकसीत करण्यासाठी पाच वर्षांचा वेळ द्या. हे जग म्हणजे मोठे मार्केट असून यामध्ये खुप सार्या संधी आहेत. फक्त स्वतःला ओळखुन स्वतःकरीता योग्य क्षेत्र निवडण्याची गरज असल्याचे यावेळी ते म्हणाले

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन नलावडे यांनी केले. डॉ. अवधुत वाळुंज यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार डॉ. कैलास कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य उगले, संस्कृती सरोदे, साई मंडलीक व मधुरा लांडगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

error: Content is protected !!