Homeताज्या बातम्याशुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन’ दिनानिमित्त भव्य देशी गोवंश प्रदर्शन व...

शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन’ दिनानिमित्त भव्य देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवादाचे आयोजन

शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन’ दिनानिमित्त भव्य देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवादाचे आयोजन

१४ देशी गोवंश जाती, देशातील सर्वाधिक दूध देणाऱ्या देशी गाई, सर्वात छोटी ‘पंगनूर’ गाय, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पशुपालन तंत्रज्ञान, गो-परिक्रमा, गो-पर्यटन केंद्र, बायोगॅस आधारित दुग्ध प्रक्रिया युनिट आणि राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचा सहभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथील अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या २२ जुलै रोजी जयंतीनिमित्त ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने दि. २० ते २२ जुलै या कालावधीत ‘शाश्वत देशी गोपालन’ राष्ट्रीय परिसंवाद, भव्य देशी गोवंश प्रदर्शन, आरोग्य व रक्तदान शिबिर, अवयवदान जनजागृती, तांत्रिक प्रात्यक्षिके आणि शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशी गोवंश संवर्धनाला आधुनिक संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत पशुपालनाची जोड देणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व गोप्रेमी, शेतकरी, पशुपालक, संशोधक, कृषि विद्यार्थी, शाळा कॉलेज आणि नागरिकांसाठी ज्ञान, अनुभव आणि प्रेरणेचा अनोखा मेळा ठरणार आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            कृषि महाविद्यालय, पुणे, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद पुणे, कात्रज दुध संघ, पुणे आणि पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री. तुषार पवार, तसेच विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, संशोधक आणि राज्यभरातील हजारो शेतकरी उपस्थित राहणार आहेत. तसेच या उपक्रमात विविध शासकीय, निमशासकीय संस्था आणि कृषि क्षेत्रातील संघटनांचा सक्रिय सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेला देशातील पहिलाच सर्वसमावेशक देशी गाय संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प आहे. देशी गोवंश संवर्धन आणि शाश्वत ग्रामीण विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे केंद्र देशी गोवंश संवर्धन, संशोधन, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचे प्रभावी केंद्र म्हणून विकसित होत आहे.

              दि. २० व २१ जुलै रोजी आयोजित राष्ट्रीय परिसंवादात देशातील विविध राज्यांतील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि तज्ज्ञ ऑनलाइन माध्यमातून सहभागी होऊन देशी गोवंश संवर्धन, प्रजनन व्यवस्थापन, पशुपोषण, दुग्ध व्यवसाय, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरील पशुपालन, सेंद्रिय शेती, मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ तसेच देशी गाईवर आधारित अत्याधुनिक संशोधन यावरील निष्कर्ष सादर करणार आहेत. संशोधक, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी हा परिसंवाद ज्ञानवर्धक ठरणार आहे. दि. २१ जुलै रोजी मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने वैद्यकीय कक्ष आणि डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, स्वेच्छा रक्तदान शिबिर आणि अवयवदान जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रदर्शनामध्ये देशभरातील १४ प्रमुख देशी गोवंश जातींच्या तब्बल २५० गाईंचे प्रदर्शन करण्यात येणार असून, देशातील सर्वाधिक दूध देणाऱ्या देशी गाई, देशातील सर्वात छोटी ‘पंगनूर’ गाय, विविध दुर्मिळ देशी गोवंश जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये प्रत्यक्ष पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. याशिवाय प्रदर्शनामध्ये पशुपालनातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर, गाईच्या आरोग्य व उत्पादकतेवर लक्ष ठेवणारे आधुनिक सेन्सर, स्वयंचलित उघडझाप व्यवस्था असलेले अत्याधुनिक गोशाळा शेड, बायोगॅस आधारित दुग्ध प्रक्रिया युनिट, दूध व विविध दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना, संशोधनाधारित तंत्रज्ञान आणि आधुनिक पशुपालन व्यवस्थापन यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. या केंद्रात विकसित करण्यात आलेले देशातील पहिले गो-पर्यटन केंद्र, गो-परिक्रमा, तसेच देशी शाश्वत गोपालनाचे आदर्श मॉडेल हीदेखील या कार्यक्रमाची विशेष आकर्षणे असणार आहेत. शेतकरी, पशुपालक आणि विद्यार्थी यांना आधुनिक तंत्रज्ञानासह देशी गोवंश आधारित शाश्वत पशुपालनाची प्रत्यक्ष माहिती आणि अनुभव मिळणार आहे.

तरी या देशी गोवंश संवर्धन, शाश्वत पशुपालन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांचा लाभ महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, पशुपालक, कृषी विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र,पशुसंवर्धन विभाग, कृषि महाविद्यालय, पुणेच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यापीठ प्रतिनिधी.आर.आर.जाधव

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

error: Content is protected !!