कृषी प्रक्षेत्र नसताना विद्यालय मान्यतेचा प्रस्ताव फुले कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या सभेसमोरील धक्कादायक प्रकार
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) संलग्न कृषी तंत्रज्ञान विद्यालय सुरू करण्यासाठी विद्यापीठाच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणासाठी स्वतंत्र कृषी प्रक्षेत्र उपलब्ध असणे बंधनकारक आहे; परंतु कृषी प्रक्षेत्र नसताना एका विद्यालयाचा मान्यता व संलग्नतेचा प्रस्ताव विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या सभेसमोर आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सभेला उपस्थित असलेले कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार किशोर दराडे येवला (जि. नाशिक) येथील एका कृषी तंत्रज्ञान विद्यालयाच्या मान्यता व संलग्नतेचा प्रस्ताव महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या सभेसमोर तीन महिन्यांपूर्वी आला.(नाशिक) यांनी या विद्यालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यास हरकत घेतली. विद्यापीठाच्या निकषानुसार या विद्यालयाला जमीन नाही, असा आक्षेप दराडे यांनी घेतला.महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी शिक्षण विभागाच्या समितीने येवला येथे जाऊन कृषी तंत्रज्ञानविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल दिला. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणासाठी कृषी प्रक्षेत्राची स्थळ पाहणी केल्याचा उल्लेख आहे. त्यानुसार कार्यकारी परिषदेच्या सभेसमोर विद्यालयाच्या मान्यतेचा प्रस्ताव आल्याने दराडे यांनी संताप व्यक्त केला होता.याप्रकरणी संबंधितांना निलंबित करावे, अशी मागणी दराडे यांनी सभेत केली.चौकशी करून त्यानुसार अशासकीय समिती गठित करून संबंधित विद्यालयाच्या कृषी प्रक्षेत्राची व इतर निकषांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर वरील प्रकार उघडकीस आला.दरम्यान, शुक्रवारी दिनांक . १५ कार्यकारी परिषदेच्या सभेच्या अजेंड्यावर पुन्हा त्याच कृषी तंत्रज्ञान विद्यालयाच्या मान्यतेचा प्रस्ताव आला. त्यावर दराडे यांनी तीव्र संतापव्यक्त केला. त्यानंतर या विद्यालयाचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. सभा संपल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी निम्नस्तर कृषी शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक यांची निफाड येथे कृषी संशोधन केंद्रात तडकाफडकी बदली करून या विषयावर पडदा टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यावर ‘सकाळ’शी बोलताना डॉ. अमोलिक म्हणाले की, ‘येवला येथीलकृषी तंत्रज्ञान विद्यालयाचा प्रस्ताव दोन वर्षापासून प्रलंबित होता. आमच्या समितीने स्थळ पाहणी केली. त्यावेळी फळबाग, गायांचा गोठा असे कृषी प्रक्षेत्र व सातबारा उतारे दाखविण्यात आले. दराडे यांनी आक्षेप घेतल्यावर अशासकीय समितीने पुन्हा पाहणी केली. विद्यालयाच्या प्रक्षेत्राचे ऑनलाइन सातबारा उतारे तपासल्यावर उतारे निघत असतात
विद्यापीठ प्रतिनिधी आर.आर. जाधव

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




