Homeताज्या बातम्यादुर्गम भागातील शेतकर्यांना राहुरी कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

दुर्गम भागातील शेतकर्यांना राहुरी कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

दुर्गम भागातील शेतकर्यांना राहुरी कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

 महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेचा पौष्टिक तृणधान्य प्रकल्प राबविला जात आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यात राबविला जात आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञांनी अकोले तालुक्यातील धामणवन या दुर्गम गावात जाऊन शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, उद्यानविद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. अन्सारखान अत्तार आणि पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील अडांगळे यांचा समावेश होता. यावेळी धामणवन येथील हनुमान शेतकरी गटाचे शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. खर्डे यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या पौष्टिक तृणधान्य प्रकल्पाची माहिती दिली. त्याचे उद्दिष्ट स्पष्ट करताना ते म्हणाले की या भागात पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीने घेणार्या नागली पिकाला आता आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आले आहे. नाचणीमधील पौष्टिक गुणधर्म पाहता महात्मा फुले कृषि विद्यापीठाने फुले कासारी नावाचा वाण विकसित केलेला आहे. शेतकर्यांनी या वाणाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रा. अत्तार यांनी शेतकर्यांना फळपिके आणि भाजीपाला पिकांबद्दल माहिती दिली. डॉ. अडांगळे यांनी दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी चारा पिकांचे महत्त्व तसेच शेळीपालन आणि कुक्कुटपालन याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी या शेतकरी गटाला फुले कासारी या नागली वाणाच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संतुलित खत वापराविषयी आणि खेत बचाओ अभियान याबद्दल जनजागृती करण्यात आली. शेतकर्यांनी तयार केलेल्या भाताची फुले समृद्धी वाणाच्या रोपवाटिकेला शास्त्रज्ञांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेतकरी गटाचे अध्यक्ष लक्ष्मण धराडे, सचिव नामदेव सुकटे, यशवंत बारामते आणि सदस्य उपस्थित होते.

विद्यापीठ प्रतिनिधी.आर.आर.जाधव 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

0
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप राहुरी विद्यापीठ, दि. 19 ऑगस्ट, 2026 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन...

error: Content is protected !!